Arun Bali Passes Away : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली अनेक दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. नसा आणि स्नायू यांच्यातील बिघाडामुळे हा आजार होतो. अरुण बाली यांच्या निधनाने टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अरुण बाली यांनी आपल्या करिअरमध्ये शाहरुख खानपासून अक्षय कुमार आणि सुशांत सिंग राजपूतसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे. मनोरंजन क्षेत्रातील बालींचे खूप मोठे आणि प्रसिद्ध नाव होते.
हेही वाचा – वर्ल्डकप येऊ दे बाप्पा..! सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला रोहित शर्मा; पाहा PHOTO
Veteran actor #ArunBali passes away at the age of 79 years in #Mumbai #RIP pic.twitter.com/l1NvO5knUg
— Sachin Dubey (@iamsachindubey) October 7, 2022
Veteran actor Arun Bali passes away at the age of 79 years in Mumbai
— ANI (@ANI) October 7, 2022
अरुण बाली यांनी ४० हून अधिक चित्रपट आणि २५ हून अधिक टीव्ही शोमध्ये काम केले. अरुण बाली हा टीव्ही शो पाहणाऱ्यांसाठी परिचित चेहरा असेल. त्याने अनेक मोठ्या आणि सुपरहिट शोमध्ये काम केले. बाली यांनी ९० च्या दशकापासून करिअरला सुरुवात केली होती. १९९१ मध्ये आलेल्या ‘सौगंध’ या सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते यलगार, राजू बन गया जेंटलमन, फूल और अंगारे, सत्या, राजकुमार, हे राम, लगे रहो मुन्नाभाई, केदारनाथ, ३ इडियट्स, पीके, पानिपत, लाल सिंह चड्ढा, बर्फी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले. अरुण बाली हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्मातेही होते. त्यांना गायनाचाही छंद होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि तीन मुली आहेत.