Bitcoin rewards for vaping Cannabis : ज्या तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुसह्य करायला हवे होते, तेच तंत्रज्ञान आता मानवी मेंदूला आणि आरोग्याला गुलाम बनवण्यासाठी वापरले जात असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “गांजा ओढा आणि थेट तुमच्या बँक खात्यात बिटकॉईन जमा करा,” अशी उघड ऑफर देणारे एक अजब आणि तितकेच धोकादायक उपकरण सध्या जागतिक बाजारात धुमाकूळ घालत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि ‘कॅनॅबिस’ (गांजा) संस्कृतीचे एकत्रीकरण करण्याचा दावा करणाऱ्या या स्टार्टअपवर आता जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, वैद्यकीय क्षेत्रातून यावर बंदी आणण्याची मागणी होत आहे.
तंत्रज्ञानाचा हा नवा आणि भयंकर प्रयोग ‘Puffpaw’ या ब्लॉकचेन हार्डवेअर उत्पादक कंपनीने केला आहे. कंपनीने बाजारात आणलेल्या ‘Gudtrip’ नावाच्या विशिष्ट प्रकारच्या कॅनॅबिस व्हेप पेनच्या (Vape Pen) माध्यमातून ग्राहकांना हे आमिष दाखवले जात आहे. पहिल्यांदाच ड्रग्ज किंवा व्यसनाचा थेट संबंध डिजिटल चलनाशी (Cryptocurrency) जोडण्यात आल्यामुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर वळण मिळाले आहे.
wow! Puffpaw 2 is first AI-Powered Crypto Weed Vape and it's goin viral
— Jamie (@s0vali) April 20, 2026
4/20 runner🤔https://t.co/MHMlCVbLSg pic.twitter.com/MvR0iTWRsC
काय आहे हे ‘व्हेप-टू-अर्न’ मॉडेल आणि पैशांचे आमिष?
या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी गेले असता, कंपनीने अत्यंत हुशारीने या व्यसनाचे ‘गेमिंग’ (Gamification) केल्याचे दिसून येते. जेव्हा एखादा ग्राहक हे ‘Gudtrip’ व्हेप पेन खरेदी करतो, तेव्हा त्याला त्याच्या स्मार्टफोनमध्ये एक विशिष्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. हे व्हेप पेन आधुनिक NFC (नियर फील्ड कम्युनिकेशन) तंत्रज्ञान आणि क्यूआर (QR) कोडने सुसज्ज आहे.
कंपनीच्या सुरुवातीच्या जाहिरातींनुसार, “तुमचा प्रत्येक झुरका (Inhale) तुमच्या फोनशी सिंक होईल आणि तुम्हाला रिअल-टाइममध्ये बिटकॉईन किंवा गुडट्रिप पॉइंट्स मिळवून देईल.” हे उपकरण वापरणाऱ्या ग्राहकाला सुरुवातीला साधारणपणे $2 ते $3 (सुमारे २०० ते २५० रुपये) किमतीचे बिटकॉईन केवळ डिव्हाइस ॲक्टिव्हेट करण्यासाठी दिले जातात. याशिवाय, दररोज ॲपमध्ये लॉग-इन करून ‘स्ट्रीक’ राखल्यास अतिरिक्त व्हर्च्युअल पॉइंट्स देण्याचीही सोय यात करण्यात आली आहे.
तीव्र विरोधानंतर कंपनीची सारवासारव
हा प्रकार समोर येताच सोशल मीडिया आणि आरोग्य वर्तुळातून Puffpaw कंपनीवर चहूबाजूंनी टीका होऊ लागली. एका व्यसनाला प्रोत्साहन देण्यासाठी पैशांचे आमिष दाखवणे हे अनैतिक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला. या वाढत्या दबावानंतर कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवरील वाक्यरचना घाईघाईने बदलली आहे.
सुरुवातीला “प्रत्येक झुरक्यावर क्रिप्टो कमवा” (Every hit earns crypto) असे ठळकपणे लिहिणाऱ्या कंपनीने आता पलटी मारली आहे. कंपनीचे संस्थापक रेफ्फो त्से (Reffo Tse) यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, या व्हेप पेनमधील ‘पफ ट्रॅकिंग’ (झुरके मोजण्याची यंत्रणा) ही केवळ कॅलिफोर्नियातील ग्राहकांना त्यांच्या आरोग्याची आणि वापराची मर्यादा कळावी म्हणून ठेवली आहे. बिटकॉईनचे बक्षीस हे केवळ ‘लॉयल्टी बोनस’ म्हणून पहिल्यांदा उपकरण सुरू करताना दिले जाते, त्याचा थेट संबंध गांजा ओढण्याशी नाही, असा दावा आता कंपनी करत आहे. मात्र, कंपनीचे हे स्पष्टीकरण निव्वड धूळफेक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मेंदू निकामी करण्याचा आंतरराष्ट्रीय कट? आरोग्य तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
या डिजिटल व्यसनाचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल, यावर वैद्यकीय संशोधकांनी अत्यंत भीतीदायक निष्कर्ष काढले आहेत. नेदरलँड्समधील इरास्मस युनिव्हर्सिटी रोटरडॅमच्या ‘न्यूरोसायन्स ऑफ ॲडिक्शन लॅब’च्या प्रमुख जॅना कौसिजन यांनी या उपकरणाला “अत्यंत धोकादायक आणि अनैतिक” म्हटले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही व्यसनाला जेव्हा आर्थिक फायद्याची जोड मिळते, तेव्हा मानवी मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टम’ पूर्णपणे बिघडते. यामुळे व्यक्ती वेगाने व्यसनाच्या आहारी जाते आणि त्याला त्यातून बाहेर पडणे अशक्य होते.
हेही वाचा – देशात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे महावादळ; ७ तासांत २० लाख तरुण सामील!
संशोधकांच्या मते, या क्रिप्टो-व्हेपिंगमुळे खालील गंभीर आजारांचा धोका दुपटीने वाढतो:
- मानसिक आजार आणि नैराश्य (Anxiety & Panic Attacks): गांजाचे सातत्याने होणारे सेवन आणि त्यात क्रिप्टोच्या दराची मिळणारी मानसिक उत्तेजना यामुळे युझर्समध्ये तीव्र नैराश्य निर्माण होते.
- स्मरणशक्ती कमी होणे (Memory Impairment): लहान वयात किंवा सातत्याने अशा प्रकारे व्हेपिंग केल्याने मेंदूच्या विचार करण्याच्या आणि साठवून ठेवण्याच्या क्षमतेवर कायमचा परिणाम होतो.
- श्वसनसंस्थेचे गंभीर आजार (Respiratory Failure): व्हेपमधून निघणारा रासायनिक धूर फुफ्फुसातील पेशी नष्ट करतो, ज्यामुळे भविष्यात श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ शकतो.
इतिहास साक्ष आहे: ‘ड्रग-क्रिप्टो’ चे हे आधीही झालेत भयंकर प्रयोग
व्यसनाचा बाजार मांडण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये ‘पॉडकॉइन’ (PotCoin) नावाच्या एका गांजाधारित डिजिटल करन्सीने मोठी खळबळ उडवून दिली होती. या कंपनीने अमेरिकेचा माजी बास्केटबॉलपटू डेनिस रॉडमन याच्या उत्तर कोरिया दौऱ्याला स्पॉन्सर केले होते. रॉडमन प्योंगयांगमध्ये पोहोचताच या कॉनची किंमत तब्बल ९७ टक्क्यांनी वाढून बाजार मूल्य ४ कोटी डॉलर्सवर पोहोचले होते.
पण पुढे काय झाले?
अवघ्या काही महिन्यांतच पॉडकॉइन ९९ टक्क्यांहून अधिक कोसळला आणि लाखो गुंतवणूकदारांचे पैसे पाण्यात गेले.
Puffpaw कंपनी देखील आधी स्वतःचे ‘VAPE’ नावाचे टोकन आणण्याच्या तयारीत होती, ज्याचा उल्लेख त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून नंतर डिलीट केला. आता स्वतःचे टोकन न आणता थेट बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवून ते ग्राहकांना आकर्षित करत आहेत, जे भविष्यात मोठ्या आर्थिक आणि शारीरिक फसवणुकीचे कारण ठरू शकते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!