पवईत थरार! 20 मुलांना स्टुडिओत ओलीस धरणाऱ्या संशयिताचा पोलीस एन्काऊंटर; सर्व मुले सुखरूप

WhatsApp Group

Mumbai Powai Hostage Case : मुंबईतील पवई परिसरात घडलेली घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली. एका बनावट ऑडिशनच्या बहाण्याने 20 चिमुकल्यांना RA स्टुडिओमध्ये कैद करणारा रोहित आर्य नावाचा तरुण पोलीस चकमकीत मृत्युमुखी पडला आहे. सर्व 20 मुले सुखरूप बचावण्यात पोलिसांना यश आले असून, हे ऑपरेशन काही तास चालले.

ही घटना गुरुवारी घडली. पवईतील RA स्टुडिओमध्ये मागील 10 दिवसांपासून एका वेब सीरिजसाठी बालकलाकारांची ऑडिशन प्रक्रिया सुरू होती. रोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत मुले स्टुडिओत यायची आणि परत जायची. मात्र गुरुवारी दुपारी जेवणाच्या वेळेनंतर मुलं बाहेर आली नाहीत. पालक आणि टीम सदस्यांनी चौकशी केली असता खरी माहिती समोर आली, 20 मुलांना स्टुडिओतच ओलीस धरले आहे!

तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले आणि परिसरात गोंधळ उडाला. माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ताबडतोब बचाव मोहीम सुरू केली. आरोपीकडून व्हिडिओद्वारे धमक्या मिळू लागल्या. त्याच्याकडे एअर गन आणि काही केमिकलचे डबे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने मुलांना जिवंत जाळण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा – 17 वर्षाच्या क्रिकेटरचा मृत्यू! नेट्समध्ये सराव करताना चेंडू लागला; क्रिकेटविश्वात शोककळा

चकमकीचे थरारक क्षण

पोलिसांनी आरोपीशी संवाद साधून त्याला शरण येण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सतत धमक्या देत राहिला. त्यानंतर पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीचा काच फोडून आत प्रवेश केला. यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यात आरोपी रोहित आर्य याच्या छातीत गोळी लागली आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी स्टुडिओतून एअर गन आणि केमिकलचे डबे जप्त केले असून फॉरेन्सिक पथक तपास करत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कौशल्याने ऑपरेशन पूर्ण करून सर्व 20 मुलांना सुरक्षित बाहेर काढले. पालकांनी व नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

आरोपीने हे का केले?

माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीने अनेक सरकारी प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. त्याचे नुकसान झाले होते. तो यासाठी सरकार आणि संबंधित विभागाला दोष देत होता. सरकारशी संवाद साधण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने हे धोकादायक पाऊल उचलले. त्याने जाहिरातींमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलावले होते.

रोहित आर्य कोण आहे?

रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी आहे. शिवसेना नेते दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना त्यांना एका शाळेच्या प्रकल्पाची निविदा मिळाली होती. रोहित आर्यचा आरोप असा होता, की त्याला त्या प्रकल्पाचे पैसे मिळाले नाहीत. दीपक केसरकर मंत्री असताना त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर वारंवार निदर्शने केली होती अशी प्राथमिक माहिती आता समोर येत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment