“तुमच्या स्टोरीवर सिनेमा बनणार…’’, फडणवीसांनी केलं भाकीत; अमोल मुझुमदारांची रिअ‍ॅक्शन पाहाच!

WhatsApp Group

Devendra Fadnavis On Amol Muzumdar : मुंबईत शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या ताऱ्यांचा भव्य सत्कार केला. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी नुकत्याच झालेल्या महिला वर्ल्डकप 2025 मध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.

या शानदार यशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत आयोजित कार्यक्रमात या सर्वांचा गौरव करत त्यांना स्मृतीचिन्हे आणि रोख पुरस्कार प्रदान केले. स्मृती मंधाना आणि तिच्या सहकाऱ्यांना प्रत्येकी ₹2.25 कोटींचे बक्षीस देण्यात आले, तर प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना ₹25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, “भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच ICC महिला वर्ल्डकप जिंकून देशाचे नाव जगभर उज्ज्वल केले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीही या संघाला भेटून अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या स्मृती, जेमिमा, राधा आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा सत्कार करण्याचा आम्हाला सन्मान वाटतो.”

त्यांनी पुढे सांगितले, “राज्य सरकारच्या धोरणानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ₹2.25 कोटी इतके पारितोषिक दिले जाते. प्रशिक्षकांनाही ₹25 लाख देण्यात येतात. महाराष्ट्रातले खेळाडू देशासाठी विजय मिळवतात, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.”

“तुमच्या स्टोरीवर निश्चितपणे सिनेमा बनणार..’’

फडणवीसांनी अमोल मुझुमदार यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी एक भाकीतही केलं. ते म्हणाले, “अमोल मुझुमदारजी खरोखरचं, जी मेहनत आपण घेतलेली आहे, भारतीय क्रिकेटमध्ये तुम्ही विशेषत: फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जे रेकॉर्ड तयार केलेत, म्हणजे मला असं वाटतं की अलिकडच्या काळामध्ये तुमची स्टोरी खूप व्हायरल झाली. मी तुम्हाला आजच भाकीत करतो, येत्या काही दिवसात तुमच्या स्टोरीवर निश्चितपणे सिनेमा बनणार आहे. चिकाटी आणि दृढनिश्चय या दोन गोष्टी सांगायच्या असतील, तर अमोल मुझुमदारांचे नाव आपल्याला घ्यावं लागेल.’’

दरम्यान, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर देशभरात या विजेत्या महिला खेळाडूंचा सत्कार सुरू आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिला ₹1 कोटींचे बक्षीस देऊन गौरविले. छत्तरपूर जिल्ह्यातील घुवारा गावातील क्रांतीने वर्ल्डकप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – ‘त्याने पीरियड्सबद्दल विचारलं…’, बांगलादेशच्या क्रिकेटरचे सिलेक्टरवर आरोप, क्रिकेटविश्वात खळबळ!

त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी फिरकीपटू श्री चरनी हिचा सत्कार केला. माजी कर्णधार मिथाली राज यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नायडू यांनी श्री चरनीला विशेष गौरवचिन्ह प्रदान केले आणि भारतीय संघाच्या विजयाचे कौतुक केले.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने केलेल्या या ऐतिहासिक पराक्रमामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी या खेळाडूंना “नवभारताच्या शेरण्या” म्हणून गौरविले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment