हरभजन सिंगचा पाकिस्तान खेळाडूसोबत हस्तांदोलनाचा व्हिडिओ व्हायरल!

WhatsApp Group

Harbhajan Singh Handshake Viral Video : अबूधाबी T10 लीगमध्ये खेळत असलेल्या भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. पाकिस्तानचा खेळाडू शाहनवाज दहाणी याच्यासोबत हरभजन यांनी हस्तांदोलन केलेला व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला असून अनेक जण त्यावर टीका करत आहेत.

Asia Cup मध्ये हस्तांदोलन बंद… मग हरभजननेच नियम मोडला?

गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान टीम इंडियाने नो-हँडशेक पॉलिसी अवलंबली होती.

  • भारत-पाकिस्तान तिन्ही सामन्यांतही एकदाही हस्तांदोलन झाले नाही.
  • भारतीय महिला संघानेही वर्ल्ड कपमध्ये हाच निर्णय कायम ठेवला.
  • कतारमध्ये सुरू असलेल्या ‘रायझिंग स्टार आशिया कप’मध्ये India A नेही हेच पाऊल उचलले.

यामुळेच हरभजनचा व्हिडिओ पाहून अनेक चाहते संतापले असून, “इंडिया लेजेंड्स टीमचा सदस्य असलेला भज्जीच हस्तांदोलन कसे करू शकतो?” असा सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे, हरभजन सिंग ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’मध्ये पाकिस्तान लेजेंड्सविरुद्ध खेळण्यासही नकार देणाऱ्यांमध्ये होता.

अबूधाबी T10 लीगमध्ये हरभजनची टीम पराभूत

अबूधाबी T10 लीगमध्ये चार भारतीय खेळाडू सहभागी आहेत. त्यामध्ये हरभजन सिंग Aspin Stallions संघाचा कर्णधार आहेत.

  • स्टॅलियन्सने 10 षटकांत 114 धावा दिल्या; फक्त 1 विकेट मिळाली.
  • फलंदाजी करताना ते 107/4 वर होते.
  • फक्त 8 धावा शेवटच्या षटकात हव्या होत्या.

मात्र, शेवटच्या षटकात तीन विकेट पडल्या, त्यात हरभजन सिंगचीही विकेट होती आणि संघ अवघ्या 4 धावांनी पराभूत झाला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment