

इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला पाच कसोटी सामन्यांच्या (IND vs ENG) मालिकेसाठी भारताचा व्हिसा मिळण्यास विलंब झाला, यामुळे बशीरला यूएईमधून इंग्लंडला परतावे लागले आहे. हैदराबादमध्ये गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीतून तो बाहेर पडला आहे. बशीरला व्हिसा न दिल्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स नाराज दिसत होता. त्याचवेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने बशीरचा व्हिसाशी (Rohit Sharma Reacts To Shoaib Bashir) संबंधित प्रश्न लवकरच सोडवला जाईल, अशी आशा व्यक्त केली. 29 वर्षीय बशीर मूळचा पाकिस्तानी आहे.
हैदराबाद कसोटीपूर्वी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, “तो (बशीर) प्रथमच येथे येत आहे. बरं, मी व्हिसा कार्यालयात बसून निर्णय घेत नाही, पण मला आशा आहे की तो येऊ शकेल आणि खेळेल.” लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडून मंजुरी अपेक्षित आहे परंतु या घडामोडीने स्टोक्सला नाराज केले आहे. रोहित म्हणाला, “एक कर्णधार म्हणून मी निराश आहे. आम्ही डिसेंबरमध्येच संघ जाहीर केला होता आणि आता बशीरला व्हिसा मिळाला नाही. अशा परिस्थितींचा सामना करणारा तो पहिला क्रिकेटर नाही. मी अशा अनेक खेळाडूंसोबत खेळलो आहे ज्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.”
हेही वाचा – प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे एअर इंडियाला 1.10 कोटींचा दंड!
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा यालाही भारताचा व्हिसा मिळण्यास विलंब झाला होता. पाकिस्तानी वंशाचा साकिब महमूद 2019 मध्ये भारत अ विरुद्धच्या मालिकेसाठी येऊ शकला नाही. बशीर इंग्लिश काऊंटी संघ सॉमरसेटकडून खेळतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा सामन्यांत 10 बळी घेतले आहेत. तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. इंग्लंडच्या कसोटी संघातील त्याचा पहिला अनुभव असा असावा, असे मला वाटत नव्हते. तो खूप तरुण आहे आणि मला त्याच्याबद्दल वाईट वाटते, असे स्टोक्स म्हणाला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!