

IPL 2024 SRH vs CSK : आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर खेळताना सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 6 विकेट्सने पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी (5 एप्रिल) झालेल्या या सामन्यात चेन्नईने यजमान संघाला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 11 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. चेन्नई सुपर किंग्जचा चार सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे. गेल्या सामन्यातही त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा चार सामन्यांतील हा दुसरा विजय ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने अवघ्या 12 चेंडूत 37 धावा केल्या, ज्यात 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. अभिषेकच्या खेळीने हैदराबादला गती दिली. अभिषेक बाद झाल्यानंतर, एडन मार्कराम आणि ट्रॅव्हिस हेड यांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या, ज्यामुळे चेन्नई पूर्णपणे बॅकफूटवर आली.
सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार एडन मार्करामने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. तर इम्पॅक्ट प्लेयर हेडने 24 चेंडूंत 31 धावांची खेळी खेळली, ज्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने पाच गडी गमावून 165 धावा केल्या. शिवम दुबेने 24 चेंडूंत 4 षटकार आणि दोन चौकारांसह सर्वाधिक 45 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 30 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. रहाणे आणि शिवममध्ये 65 धावांची भागीदारी झाली.
रवींद्र जडेजानेही 23 चेंडूंचा सामना करत नाबाद 31 धावा केल्या. जडेजाने आपल्या खेळीत चार चौकार मारले. महेंद्रसिंu धोनीही शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. धोनीने दोन चेंडूंचा सामना करत एक धाव घेतली. सनरायझर्सकडून भुवनेश्वर कुमार, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्श हैदराबाद – अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिश थिक्षना.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा