‘डोळे फोडणाऱ्या’ कार्बाईड गनवर बंदी; 14 मुलांची दृष्टी गेली; 60 हून जास्त जखमी

WhatsApp Group

Carbide Gun Ban : दिवाळीचा सण आनंदाचा असावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण मध्यप्रदेशातील राजधानी भोपाळमध्ये या दिवाळीत काही कुटुंबांसाठी आनंदाऐवजी वेदना घेऊन आली. शहरात विक्रीस आलेल्या कॅल्शियम कार्बाइड गन म्हणजेच ‘डोळे फोडू गन’ मुळे तब्बल 60 हून अधिक मुलांना गंभीर दुखापत झाली आहे.

या धोकादायक गनमुळे अनेक मुलांचे डोळे जखमी झाले, चेहऱ्यावर जखमा झाल्या आणि काहींच्या दृष्टीवरसुद्धा परिणाम झाला. त्यामुळे भोपाळ जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी या गनच्या विक्री, खरेदी आणि साठवणुकीवर तात्काळ बंदी घातली आहे.

कलम 163 अंतर्गत कठोर कारवाईचा आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 163 अंतर्गत आदेश जारी करताना म्हटले आहे की, या गनची विक्री, साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांवर तात्काळ FIR दाखल केली जाईल. शहरातील सर्व एसडीएम आणि पोलीस अधिकारी फटाक्यांच्या दुकानांची तपासणी करत आहेत, जेणेकरून कुठेही कार्बाइड गनचा साठा नसेल.

दिवाळीत 60 पेक्षा जास्त मुलं जखमी

दिवाळीच्या रात्री शहरात कार्बाइड गनचा वापर करताना तब्बल 60 पेक्षा अधिक मुलं जखमी झाली. बहुतांश मुलं 8 ते 14 वर्षे वयोगटातील आहेत.  हमीदिया रुग्णालयात भरती असलेल्या मुलांच्या पालकांनी या गनवर कायमस्वरूपी बंदीची मागणी केली आहे.

हेही वाचा – VIDEO : सगळं जळून गेलं… पण सीट नंबर U-7 वर बसलेला जयंत मृत्यूच्या जबड्यातून वाचला!

कशामुळे धोकादायक आहे ही ‘कार्बाइड गन’?

तज्ज्ञांच्या मते, या गनमध्ये गॅस लाइटर, प्लास्टिक पाइप आणि कॅल्शियम कार्बाइड वापरले जाते. जेव्हा कार्बाइड पाण्याशी संपर्कात येते तेव्हा अॅसिटिलीन गॅस तयार होतो आणि थोड्याशा ठिणगीने मोठा स्फोट होतो. या स्फोटामुळे प्लास्टिकचे छोटे तुकडे छर्र्यांसारखे उडतात आणि चेहऱ्यावर, डोळ्यांवर आणि त्वचेवर गंभीर जखमा करतात.

150 हून अधिक तक्रारी, काही मुलं अजूनही उपचाराधीन

दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी शहरभरात 150 पेक्षा अधिक जखमींच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवले गेले असले तरी काही मुलं अजूनही एम्स व हमीदिया रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सीएमएचओचा इशारा

भोपाळचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMHO) यांनीही स्पष्ट केले आहे की ‘कार्बाइड पाइप गन’ अतिशय धोकादायक असून ती मुलांच्या वापरासाठी नव्हे. त्यांनी नागरिकांना विनंती केली आहे की अशा बनावट किंवा घरगुती बनवलेल्या गनपासून दूर राहावे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment