चेर्नोबिलमध्ये दिसले निळे कुत्रे! रेडिएशनचा परिणाम की काही रहस्यमय केमिकलचा खेळ?

WhatsApp Group

Chernobyl Blue Dogs : चेर्नोबिल… हे नाव ऐकताच 1986 मधील जगाला हादरवून टाकणारा अणुभट्टी स्फोट आठवतो. त्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण प्रदेशात न्यूक्लियर रेडिएशन पसरले आणि आजपर्यंत तो भाग निर्जन आहे. मात्र, या विनाशाच्या सावलीत अजूनही काही जिवंत जीव राहत आहेत आणि अलीकडे त्यांच्याशी संबंधित एक विचित्र घटना समोर आली आहे.

चेर्नोबिलमध्ये काही कुत्र्यांचा रंग निळा झाला आहे! स्थानिक लोक आणि ‘डॉग्स ऑफ चेर्नोबिल’ संस्थेचे सदस्य हे पाहून थक्क झाले. आता प्रश्न असा आहे, हा रंग बदल रेडिएशनमुळे झाला आहे का, की कोणत्यातरी रहस्यमय केमिकलच्या संपर्कामुळे?

47 चौरस किलोमीटरचा मृत प्रदेश, पण जिवंत कुत्र्यांची कहाणी

1986 मध्ये झालेल्या स्फोटानंतर सोव्हिएत सरकारने जवळपास 47 चौरस किलोमीटरचा भाग रिकामा केला. या क्षेत्राला ‘Chernobyl Exclusion Zone’ म्हटले जाते. तेव्हापासून हा भाग मानवविरहित आहे, पण काही कुत्र्यांनी तिथेच जगण्याची लढाई सुरू ठेवली. आज त्यांचे वंशजच त्या परिसरात वाढले आहेत.

या कुत्र्यांची काळजी घेणारी ‘Dogs of Chernobyl’ ही संस्था त्यांना अन्न, औषधं आणि सुरक्षित ठिकाण उपलब्ध करून देते. सध्या या संस्थेच्या नोंदीनुसार या क्षेत्रात सुमारे 700 कुत्रे राहतात.

हेही वाचा – राज्यपालांच्या नातवाचा रहस्यमय मृत्यू! आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलं, “आत्मे मला त्रास देतात..”

निळ्या रंगाचे तीन कुत्रे दिसले!

अलीकडे संस्थेने कुत्र्यांसाठी नियमित स्टेरिलायझेशन आणि मेडिकल चेकअप सुरू केले असताना, कर्मचाऱ्यांना काहीतरी वेगळं दिसलं, तीन कुत्र्यांचे केस निळे झाले होते! स्थानिकांनी सांगितले की हे कुत्रे काही दिवसांपूर्वी सामान्य होते, पण आता त्यांच्या अंगावरचा रंग हळूहळू बदलत आहे.

केमिकल की रेडिएशन? वैज्ञानिकही चकित

या घटनेनंतर कुत्र्यांच्या केअरटेकर्सना संशय आहे की हे प्राणी कदाचित कोणत्यातरी औद्योगिक केमिकलच्या संपर्कात आले असावेत, ज्यामुळे त्यांचा रंग बदलला आहे. दुसरीकडे वैज्ञानिकांनी हवेतील भारी धातू (Heavy Metals) आणि रेडिएशनचे परिणाम यांचाही अभ्यास सुरू केला आहे.

एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, कुत्र्यांच्या फर, त्वचा आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले आहेत. ‘Dogs of Chernobyl’ संस्थेने सोशल मीडियावर लिहिले, “आम्हाला अजून कारण माहित नाही. आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तपासणी करता येईल. हे कुत्रे खूप सक्रिय आहेत आणि आजपर्यंत आम्हाला त्यांना पकडता आलेले नाही.”

रहस्य कायम

स्थानिक लोक म्हणतात की, जरी कुत्र्यांचा रंग विचित्र दिसत असला तरी ते पूर्णपणे निरोगी आणि सक्रिय आहेत. त्यांच्यात ना सुस्ती, ना आजारपणाची लक्षणे दिसत आहेत. तरीही संपूर्ण सत्य वैज्ञानिक तपासणीनंतरच समोर येईल.

चेर्नोबिलचा हा ‘ब्लू डॉग मिस्ट्री’ आता जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे आणि प्रश्न अजूनही तोच आहे, हा निसर्गाचा अनोखा चमत्कार आहे का, की मानवाच्या प्रयोगांचा अजून एक दुष्परिणाम?

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment