Iran state TV anchor fires AK 47 : मध्य पूर्वेच्या भूमीवर पुन्हा एकदा महायुद्धाचे ढोल वाजू लागले असून परिस्थिती अत्यंत भीषण वळणावर पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या थेट आणि अंतिम इसाऱ्यानंतर इराणमध्ये अभूतपूर्व आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायल कधीही इराणवर मोठा लष्करी किंवा हवाई हल्ला करू शकतात, या भीतीने इराण सरकारने आता आपल्या देशातील सामान्य नागरिकांना युद्धपातळीवर शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या युद्धाच्या मानसिकतेचा सर्वात धक्कादायक प्रकार इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर पाहायला मिळाला, जिथे एका न्यूज अँकरने थेट प्रक्षेपणादरम्यान (Live TV) स्टुडिओच्या छतावर थेट एटी-४७ रायफलमधून गोळ्या झाडल्या.
इराणच्या सरकारी वाहिन्यांवरून सध्या ज्या प्रकारच्या बातम्या आणि दृश्यांचे प्रक्षेपण केले जात आहे, ते पाहून जागतिक संरक्षण तज्ज्ञही चक्रावून गेले आहेत. संपूर्ण देश एका संभाव्य परदेशी आक्रमणाचा सामना करण्यासाठी सज्ज होत असल्याचे चित्र तेहरानमधून समोर येत आहे.
State tv show Iranians how use AK-47 & FIRE it LIVE IN STUDIO as 'prep for US ground invasion' https://t.co/i5H6ymG3Wo pic.twitter.com/6pRBD6tLra
— RT (@RT_com) May 16, 2026
थेट प्रक्षेपण बनले लष्करी छावणी; अँकरने झाडल्या गोळ्या
सोशल मीडियावर सध्या इराणच्या ‘ओफोग’ (Ofogh) या सरकारी न्यूज चॅनेलचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वाहिनीचा मुख्य अँकर हुसेन हुसेनी हा थेट प्रक्षेपणादरम्यान हातात घातक रायफल घेऊन बसलेला दिसतो. त्याच्या बाजूला इराणच्या लष्करातील म्हणजेच ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) चा एक मुखवटा घातलेला कमांडो उभा आहे. हा कमांडो अँकरला लाईव्ह टीव्हीवर बंदूक कशी चालवायची, याचे प्रशिक्षण देत आहे. हे सांगत असतानाच अचानक अँकर हुसेन हुसेनी याने रायफल थेट स्टुडिओच्या छताकडे रोखली आणि थेट गोळीबार केला. जिवंत प्रक्षेपणात झालेला हा गोळीबार इराणमधील सामान्यांना युद्धासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.
याच धर्तीवर इराणच्या ‘चॅनेल ३’ वरील महिला सादरकर्ता मोबिना नासिरी हिचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. मोबिना हिने दोन्ही हातात अॅसॉल्ट रायफल पकडून प्रेक्षकांशी संवाद साधला. तिने थेट कॅमेऱ्यासमोर सांगितले, “मला वनक स्क्वेअरवरून हे शस्त्र पाठवण्यात आले आहे, जेणेकरून तुमच्यासारखीच मीसुद्धा देशाच्या संरक्षणासाठी बंदूक चालवायला शिकू शकेन.”
मशिदींमध्ये लष्करी प्रशिक्षण
‘अल जझीरा’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, इराणमधील परिस्थिती केवळ टीव्ही स्टुडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही. इराणमधील प्रमुख शहरांमधील मशिदींमध्ये सामान्य नागरिकांसाठी हलकी शस्त्रास्त्रे चालवण्याचे विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहेत. यामध्ये तरुण, वृद्ध आणि महिलांनाही रायफल कशी लोड करायची आणि अचूक निशाणा कसा साधायचा, याचे धडे दिले जात आहेत. देशातील रस्त्यांवर आणि चौकाचौकांमध्ये ‘पब्लिक गन किओस्क’ (बंदुकीची दुकाने किंवा केंद्रे) उभारण्यात आली आहेत. अमेरिकेचे सैन्य जर इराणच्या भूमीवर उतरले, तर देशातील प्रत्येक नागरिक एका सैनिकासारखा लढेल, अशी रणनीती इराणच्या प्रशासनाने आखली आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, १५ आणि १६ मे दरम्यान इराणच्या यंत्रणांनी हे ‘सार्वजनिक सज्जता अभियान’ अधिक तीव्र केले आहे.
History repeats…
— Masih🇮🇷🇺🇲 (@Masihh) May 16, 2026
In Libya, Hala Misrati appeared on state TV with a pistol, pledging loyalty to Gaddafi.
Soon after, state TV fell.
Tripoli fell.
The regime collapsed.
Now in Iran, Mobina Nasiri appears on state TV holding an AK-47, delivering the same visual message:… pic.twitter.com/oGKLc9zKYY
डोनाल्ड ट्रम्प यांची अंतिम चेतावणी
इराणमध्ये अचानक सुरू झालेल्या या लष्करी हालचालींमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली एक अत्यंत आक्रमक आणि विनाशकारी धमकी कारणीभूत आहे. सध्या सुरू असलेला नाजूक युद्धविराम कोणत्याही क्षणी तुटू शकतो, अशा स्थितीत ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणला थेट इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी लिहिले, “इराणसाठी घड्याळाचे काटे वेगाने फिरत आहेत. त्यांनी लवकरात लवकर शांतता कराराच्या दिशेने पावले टाकावीत, अन्यथा भविष्यात त्यांचे अस्तित्वच उरणार नाही. वेळ अत्यंत मौल्यवान आहे आणि ती वेगाने संपत चालली आहे!” ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराण सरकार अधिकच आक्रमक आणि सावध झाले आहे.
🇮🇷 Iran is training militia volunteers inside mosques: elderly, adults, youth, and children with AK-47s and RPGs
— Mario Nawfal (@MarioNawfal) May 17, 2026
The IRGC is calling them Homeland Defenders
When a regime starts arming kids in places of worship, they're running out of optionspic.twitter.com/F3pYaZTYHo https://t.co/27Ncu6FwUd
पेन्टागॉन आणि इस्रायलची हवाई हल्ल्यांची गुप्त तयारी
दुसरीकडे, ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ (NYT) ने एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेन्टागॉन’ आणि इस्रायलचे लष्कर इराणवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्याची योजना आखत आहेत. मध्य पूर्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संभाव्य हल्ल्यांसाठी दोन्ही देशांच्या हवाई दलाने सराव आणि आवश्यक पूर्वतयारी सुरू केली आहे.
या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील वातावरण कमालीचे तापले असून, कोणत्याही क्षणी एका मोठ्या युद्धाची ठिणगी पडू शकते. इराणने आपल्या सर्वसामान्य जनतेला शस्त्रास्त्रांनी सज्ज करणे हा याच संभाव्य युद्धाचा पूर्वतयारीचा भाग मानला जात आहे. जर हा तणाव निवळला नाही, तर येत्या काही दिवसांत जागतिक अर्थव्यवस्थेला आणि शांततेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!