प्रेग्नंट पत्नीचा निर्घृण खून! नवऱ्याने तुकडे करून फेकले नदीत, पोलिसांनी उघड केला थरारक गुन्हा

WhatsApp Group

Hyderabad Pregnant Woman Killed : हैदराबादमधून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा नवऱ्याने निर्घृण खून केला असून तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही थरारक घटना हैदराबादजवळील मेडिपल्ली परिसरातील बालाजी हिल्समध्ये घडली.

बालाजी हिल्समध्ये वास्तव्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय स्वाती आणि तिचा पती महेंदर हे दोघेही विकाराबाद जिल्ह्यातील कामारेड्डीगुडा येथील रहिवासी होते. प्रेमात पडल्यावर दोघांनी विवाह केला आणि बालाजी हिल्समध्ये राहायला आले.

महेंदर हा एका राईड-हेलिंग कंपनीत चालक म्हणून काम करत होता. शनिवारी दुपारी 4.30 वाजता त्याने पत्नी स्वातीचा खून केला. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले आणि काही भाग मुसी नदीत फेकले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

खून केल्यानंतर महेंदरने आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की, स्वाती बेपत्ता झाली आहे. बहिणीला संशय आल्यामुळे तिने एका नातेवाईकाला माहिती दिली. त्या नातेवाईकाने महेंदरला पोलीस ठाण्यात घेऊन गेलं. तिथेही महेंदरने सुरुवातीला पत्नी गायब असल्याचे खोटे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने अखेर पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

डीएनए टेस्ट करून ओळख

महेंदरला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने स्वातीचा डोके, हात आणि पाय नदीत फेकले होते. मात्र अद्याप हे अवयव सापडलेले नाहीत. तिचे फक्त धड घरामध्ये आढळून आले आहे. “आम्ही फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. फक्त धड आढळले आहे, त्यामुळे डीएनए टेस्ट करून ओळख पटवली जाईल,” असे डीसीपी पी. व्ही. पद्मजा यांनी सांगितले.

गुन्हा भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलमांखाली नोंदवण्यात आला असून तपास फास्ट-ट्रॅक पद्धतीने केला जाणार आहे.

स्वातीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचं आणि जावयाचं काही काळापासून मतभेद होते आणि त्यामुळे संवाद बंद झाला होता. “माझी मुलगी म्हणायची की सर्व ठीक आहे, पण तो तिला नेहमी त्रास देत होता. ज्याप्रमाणे त्याने माझ्या मुलीला छळलं, त्याच पद्धतीने त्यालाही शिक्षा झाली पाहिजे,” असे त्यांनी संतापाने सांगितले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment