

IPL 2024 MI vs CSK : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनमध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे, ज्यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने 20 षटकात 4 गडी गमावून 206 धावा केल्या आहेत. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने 33 चेंडूत अर्धशतक केले. तर शिवम दुबेने 28 चेंडूत अर्धशतक ठोकले. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याला 3 षटकार ठोकले.
अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्रने चेन्नईसाठी सलामी दिली. रहाणे स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कप्तान ऋतुराज गायकवाडने मोर्चा सांभाळला. त्याने 5 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावा केल्या. रचिन 21 धावांवर श्रेयस गोपालचा बळी ठरला. त्यानंतर शिवम दुबेने फटकेबाजी केली. दुबेने 10 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – एका हातात पँट आणि एका हाताने थ्रो…! फिल्डिंग करताना रोहित शर्मासोबत गमतीशीर घटना, पाहा Video
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल.
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कप्तान), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!