एका हातात पँट आणि एका हाताने थ्रो…! फिल्डिंग करताना रोहित शर्मासोबत गमतीशीर घटना, पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 MI vs CSK Rohit Sharma : वानखेडेवर आयपीएलचा एल क्लासिको सामना खेळवला जात आहे. यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची पिसे काढत फटकेबाजी केली. कप्तान ऋतुराज गायकवाडने 69 धावांची जबरदस्त खेळी केली. दरम्यान मैदानात मजेशीर घटना घडली. मुंबईचा गोलंदाज आकाश मधवाल ऋतुराजला गोलंदाजी करत होती. ऋतुराजने सुंदर फटका खेळला, जो सीमारेषेला जात होता. रोहितने हा चेंडू धावत जाऊन पडकला.

फिल्डिंग करताना रोहितची पँट खाली आली. रोहितने अडवलेला चेंडू एका हाताने थ्रो केला आणि दुसऱ्या हाताने पँट वर केली. क्रिकेटच्या मैदानात अशा गमतीशीर घटना याआधीही पाहायला मिळाल्या आहेत. रोहित शर्माच्या या प्रकारावर चाहत्यांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. संपूर्ण स्टेडियमध्ये हशा पिकला.

हेही वाचा – IPL 2024 KKR Vs LSG : फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यरचे तुफान! केकेआरची लखनऊवर सहज मात

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कप्तान), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment