

22 वर्षीय नामिबियाचा फलंदाज जॅन निकोल लॉफ्टी ईटनने (Jan Nicole Loftie-Eaton) सगळ्यांना मागे टाकले आहे आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. या फलंदाजाने नेपाळ टी-20 आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेत नेपाळ संघाविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि अवघ्या 33 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह तो या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम नेपाळचा फलंदाज कुशल मल्लच्या नावावर होता. त्याने 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध 34 चेंडूत शतक झळकावले होते.
चौकार आणि षटकारांचा पाऊस
22 वर्षांचा नामिबियाचा फलंदाज जॅन निकोल लॉफ्टी ईटनने नेपाळच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. 36 चेंडूंचा सामना करत या फलंदाजाने 101 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 मोठे षटकार आणि 11 चौकार लगावले. या डावात त्याने 280.56 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या फलंदाजाचा वेगवान शतकाचा विक्रम मोडणे इतके सोपे होणार नाही. रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी-20 शतक झळकावणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज आहे. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूत शतक झळकावले होते.
हेही वाचा – Gaganyaan Mission : अंतराळात जाणाऱ्या 4 भारतीयांची नावे जाहीर!
सर्वात वेगवान आंतरराष्ट्रीय टी-20 शतक
- जॅन निकोल लॉफ्टी ईटन (नामिबिया) – 33 चेंडू
- कुशल मल्ला (नेपाळ) – 34 चेंडू
- डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका) – 35 चेंडू
- रोहित शर्मा (भारत) – 35 चेंडू
- सुदेश विक्रमशेखर (क्रेच रिपब्लिक) – 35 चेंडू
नेपाळ, नेदरलँड आणि नामिबिया यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात सर्वात जलद शतकाचा विक्रम केला गेला. नामिबिया आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात जॅनच्या 101 धावांच्या जोरावर नामिबियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 206 धावा केल्या. लॉफ्टी ईटन व्यतिरिक्त मलान क्रुगरने 48 चेंडूत 59 धावांची खेळी केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!