

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान (IND vs ENG 1st Test) एका चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला. भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने गुरुवारी पहिल्या डावात 246 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा खेळपट्टीवर पोहोचताच स्टँडवरून एक चाहता त्याच्याकडे धावला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने 37 तर बेन डकेटने 35 धावा केल्या. भारताकडून रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारतीय डाव सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीची जर्सी घातलेला एक चाहता मैदानात आला आणि रोहित शर्माच्या जवळ जाऊन त्याच्या पायाला स्पर्श करू लागला. त्यानंतर सुरक्षेच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले.
हेही वाचा – इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्ये बदल घडवून आणणारं ‘बॅझबॉल’ काय आहे?
यशस्वीची आक्रमक खेळी!
भारताने पहिल्या डावात फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. रोहित आणि यशस्वीने पहिल्या गड्यासाठी 80 धावा फलकावर लावल्या. जॅक लीचने रोहितला (24) बाद केले. त्यानंतर यशस्वीने शुबमन गिलसोबत आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या दिवसअखेर भारताने 23 षटकात 1 बाद 119 धावा केल्या. यशस्वी 9 चौकार आणि 3 षटकारांसह 76 धावांवर नाबाद तर शुबमन 14 धावांवर नाबाद आहे. भारत अजून 127 धावांनी पिछाडीवर आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!