

आयपीएल 2024 चा लिलाव (IPL 2024 Auction In Marathi) दुबईत आयोजित केला जात आहे. लिलावाच्या चौथ्या फेरीत मिचेल स्टार्कवर पैशांचा वर्षाव झाला आहे. मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले आहे. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. चौथ्या फेरीत अल्झारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 11 कोटी 50 लाख रुपयांना विकत घेतले. याशिवाय उमेश यादवला गुजरात टायटन्सने 5 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केले आहे.
यावेळी, एकूण 332 खेळाडू 77 स्पॉटसाठी लिलावात समाविष्ट केले आहेत, ज्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव, हर्षल पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचाही समावेश आहे, ज्यांना 2 कोटी रुपयांच्या सर्वोच्च मूळ किंमत श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने 1166 खेळाडूंची यादी फ्रेंचायझींना सादर केली होती. फ्रेंचायझींच्या सल्ल्यानंतर या खेळाडूंची संख्या 333 करण्यात आली. यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत. दोन खेळाडू सहयोगी देशांचेही आहेत. या लिलावात, सर्व 10 फ्रेंचायझी एकूण 262.95 कोटी रुपये खर्च करू शकतात. उपलब्ध 77 ठिकाणांपैकी 30 परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : वाचा आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती
कॅप्ड खेळाडूंचे ऑक्शन, वाचा लिस्ट
रोव्हमन पॉवेल – राजस्थान रॉयल्स – ७.४० कोटी
रायली रुसो – अनसोल्ड
हॅरी ब्रुक – दिल्ली कॅपिटल्स – ४ कोटी
ट्रॅव्हिस हेड – सनरायझर्स हैदराबाद – ६.८० कोटी
करुण नायर – अनसोल्ड
स्टीव्ह स्मिथ – अनसोल्ड
मनीष पांडे – अनसोल्ड
वानिंदू हसरंगा – सनरायझर्स हैदराबाद – १.५० कोटी
रचिन रवींद्र – चेन्नई सुपर किंग्ज – १.८० कोटी
शार्दुल ठाकूर – चेन्नई सुपर किंग्ज – ४ कोटी
अजमतुल्ला ओमरझाई – गुजरात टायटन्स – ५० लाख
पॅट कमिन्स – सनरायझर्स हैदराबाद – २०.५० कोटी
जेराल्ड कोएट्झी – मुंबई इंडियन्स – ५ कोटी
हर्षल पटेल – पंजाब किंग्ज – ११.७५ कोटी
डॅरिल मिचेल – चेन्नई सुपर किंग्ज – १४ कोटी
ख्रिस वोक्स – पंजाब किंग्ज – ४.२० कोटी
फिलिप सॉल्ट – अनसोल्ड
ट्रिस्टन स्टब्स – दिल्ली कॅपिटल्स – ५० लाख
केएस भरत – कोलकाता नाईट रायडर्स – ५० लाख
जोश इंग्लिस – अनसोल्ड
कुसल मेंडिस – अनसोल्ड
लॉकी फर्ग्युसन – अनसोल्ड
चेतन साकारिया – कोलकाता नाईट रायडर्स – ५० लाख
अल्झारी जोसेफ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ११.५० कोटी
उमेश यादव – गुजरात टायटन्स – ५.८० कोटी
शिवम मावी – लखनऊ सुपर जायंट्स – ६.४० कोटी
मिचेल स्टार्क – कोलकाता नाइट रायडर्स – २४.७५ कोटी
जोश हेझलवूड – अनसोल्ड
जयदेव उना़डकट – सनरायझर्स हैदराबाद – १.६० कोटी
दिलशान मधुशंका – मुंबई इंडियन्स – ४.६० कोटी
मोहम्मद वकार सलामखेल – अनसोल्ड
आदिल रशीद – अनसोल्ड
अकील होसेन – अनसोल्ड
इश सोधी – अनसोल्ड
तबरेझ शम्सी – अनसोल्ड
मुजीब उर रहमान – अनसोल्ड
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!